
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील वरुड (तुका) येथील एका तरुण दाम्पत्याने दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी स्थापन केलेल्या ‘ग्रामहित’ या छोटया व्यवसायाने जगप्रसिद्ध फोर्ब्स आशियाच्या यादीत स्थान मिळवले आहे. यावर्षी सहभागी झालेल्या ६५० कंपनीमधून ‘ग्रामहित’ची निवड झाल्याने यवतमाळच्या लौकिकात भर पडली आहे. पंकज व श्वेता महल्ले हे तरुण दाम्पत्य ग्रामहितचे संस्थापक आहेत.
ग्रामहितच्या माध्यमातून शेतमाल विक्री व्यवस्थेत होणारे शेतकऱ्यांचे शोषण थांबावे. त्यांच्या मालास अधिक दर मिळून आडत, हमाली, मापारी यात खर्च होणाऱ्या पैशांची बचत व्हावी तसेच योग्य भाव मिळेपर्यंत शेतमाल तारण ठेवून त्यावर माफक दरात कर्ज सुविधा उपलब्ध असावी; या दृष्टीने मोबाइलच्या माध्यमातून बाजार व्यवस्था शेतकरीपूरक, सुलभ आणि विश्वसनीय करण्याचा पंकजचा प्रयत्न आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये ग्रामहितला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून परवाना मिळाला. शेतमाल विपणन व्यवस्थेवरील ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’ हे प्रभावी मॉडेल गेल्या दीड वर्षांपासून वरूड (तुका), सावळी सदोबा आणि कळंब येथे प्रत्यक्ष वापरले जात आहे. १२ तासांच्या आत विक्रीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कुठलीही कपात न करता जमा होतात.
यापूर्वी ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार ग्रामहितला मिळाला आहे. ‘ग्रामहित’द्वारे राबविल्या जाणाऱ्या शेतमाल विक्री व्यवस्थेच्या या वैशिष्टय़पूर्ण साखळीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा घेतली गेली आहे. अमेरिकेतील ‘अॅक्युमन इंटरनॅशनल फेलोशिप’साठीही पंकजची निवड झाली. पंकज यांनी यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातून पदवी तर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा सीएसआर प्रकल्पांतर्गत जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये उच्च पदावर काम केले. तेथील नोकरी सोडून त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे पारदर्शी मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आज ‘ग्रामहित’ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे.
झाले काय?
‘ग्रामहित’ हे शेतमाल विपणन व्यवस्थेतील ‘व्हिलेज ट्रेड सेंटर’ आहे. ही कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे.
सुरुवात कशी?
करोना काळात पंकज महल्ले या तरुणाने कॉर्पोरेट जीवनशैली सोडून पत्नी श्वेतासह थेट गाव गाठले. करोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि या काळात शेतकरी बांधवांची होत असलेली आर्थिक घुसमट त्यांनी जवळून अनुभवली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी ‘ग्रामहित प्रा. लि. कंपनी’ वरूड (तुका) गावात स्थापन केली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


