बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे. या प्रकरणाचा सध्या एसआयटीकडून तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात नुकतीच काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच धक्कादायक प्रकार घडला आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माहादेव मुंडे यांचा मुलगा हा अभ्यासिकेत जात असातना त्याला मारहाण करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली, या घटनेचा तपास सध्या एसआयटीकडून सुरू आहे. या प्रकरणात काही आरोपींची नार्को टेस्ट देखील करण्यात आली आहे. हा तपास सुरू असतानाच 19 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला मारहाण करण्यात आली आहे. प्रणव हा सोमेश्वर नगर परिसरात असलेल्या अभ्यासिकेला जात होता, याचदरम्यान प्रणव याला एका व्यक्तीने मारहाण केली आहे, दरम्यान या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षकांना निवेदन
तर दुसरीकडे हा प्रकार घडल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आलं आहे, ज्यामध्ये आपल्याला वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका आहे, असं म्हटलं आहे.
19 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांचा मुलगा प्रणव मुंडे याला मारहाण झाली, त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलांसह कुटुंबाला वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्रीगणेश कराड तसेच त्यांच्या टोळीकडून धोका असल्याचं निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे. प्रणव मुंडे याला मारहाण झाल्यामुळे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेच्या हाती काही लागलय का? आणि यामुळेच या सर्व घडामोडी घडतायत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


