मुंबई : दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईची हवा प्रदूषित; मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ वर

मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुंबईत बुधवारपेक्षा जास्त हवेतील निर्देशांक खालावला आहे.

तापमानातील घट आणि पश्चिमेकडील वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे हवेत प्रदूषण राहते. त्यामुळे बुधवारी मुंबईचा निर्देशांक १९७ एक्युआय तर दिल्लीच्या हवेतील निर्देशांक १९३ एक्युआय एवढा होता. विशेष बाब म्हणजे मुंबईपेक्षा दिल्लीची हवा कमी प्रदूषित होती. त्यामुळे मुंबईदेखील दिल्लीच्या प्रदूषणाच्या स्पर्धेत आहे की काय असं वाटू लागलं आहे. या प्रदूषित हवेपासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply