मुंबई : 'उद्धव ठाकरे यापुढेही जनतेच्या कायम लक्षात राहतील '

मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार डळमळीत झालं असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्यावर शिवसेनेने या बहुमत चाचणी आदेशाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी ३० जून रोजी घेण्याचा निर्णय दिला. बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

जयंत पाटील म्हणाले,'राज्याच्या विकासासाठी शरद पवारांनी तिन्ही पक्षांना एकत्र करून सरकार स्थापन केलं होतं. अडीच वर्षात विकासासाठी काम केलं. लोकांच्या हितासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे. बंडखोर आमदारांचे पाठबळ नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. उद्धव ठाकरे यापुढेही जनतेच्या कायम लक्षात राहतील. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला कायम पाठिंबा दिला आहे. पुढच्या काळात सर्व एकत्र बसून ठरवू'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला समोरं जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुुमत चाचणीची स्थगिती रोखली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply