मुंबई: राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिंदे गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. शिवाय अजून काही खासदार आमच्या संपर्कात असून ते देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक तर नवी मुंबईतील शिवसेनेचे ३० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असेलल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदवरुन पायउतार होण्यास भाग पाडलं आणि शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. आता स्थानिक पातळीवरही शिवसेनेची कोंडी करण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखला आहे. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी रात्री कल्याण-डोंबिवलीमधील महानगरपालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यानंतर केडीएमसीचे ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात
नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत असून हे नगरसेवक आज रात्री मुंबईत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला पडणार खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे.
ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवक शिंदे गटात
ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हे ६६ नगररसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता सत्ताकेंद्र बदलल्यामुळे आणि शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळे शिवसेनेतील होणारी नगरसेवकांची गळती ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदु:खी ठरत आहे.
शहर
- Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
महाराष्ट्र
- Amravati Crime : काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार
- Nagpur police guard : शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ
- Chhatrapati Sambhaji Nagar : मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे भुरटे, मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसे गायब
- Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाला मागितली एक लाख रुपयांची खंडणी
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh : महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा