पुणे : नामांकीत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

पुणे - पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ पसरली आहे. शहरातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने अकरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. घडलेली घटना अशी, पुण्यातील एका नामांकित शाळेत अज्ञात माथेफिरूने ११ वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. या शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना बुधवारी घडली आहे. पीडित मुलीला ओळख असल्याचा बहाणा करून ढकलत शाळेतील बाथरूम नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी संबंधित नराधमावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यात महिला अत्याचारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. या घटनेसंदर्भात नागरिक संताप व्यक्त करत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply