
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांमधील एकूण पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोहोचला असून असाच पाऊस सुरू राहिल्यास खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, उर्वरित तिन्ही धरणांमधून बुधवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ७५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात प्रत्येकी ५३, तर खडकवासला धरणक्षेत्रात १३ मि.मी. पाऊस पडला. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने वरसगाव आणि पानशेत धरणांमधून खडकवासला धरणात पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली. परिणामी खडकवासला धरणातून बुधवारी सकाळपासून १२ हजार ७३६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शहराच्या डेक्कन भागातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात २५ मि.मी., वरसगाव धरणक्षेत्रात १३ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात १२ मि.मी. तर खडकवासला धरण परिसरात पाच मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सायंकाळनंतर खडकवासला धरणातून मुठा नदीत १३ हजार ९८१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणक्षेत्रात दिवसभरात ५३ मि.मी. पावसाची नोंद झाली. हे धरण १०० टक्के भरले असून या धरणातून २४६३ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे या धरणांमधून कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत
टेमघर ३.७१ (१००), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ७.६१ (९९.२२), पवना ८.५१ (१००), डिंभे १२.४९ (१००), चासकमान ७.५७ (१००), गुंजवणी ३.६७ (९९.३८), निरा देवघर ११.७३ (१००), भाटघर २३.५० (१००), वीर ९.४१ (१००) आणि उजनी ५३.५७ (१००)
शहर
- Pune : पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत मार्गांचा विस्तार; रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी
- डायने कॉयल यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने‘वन- मॅन युनिकॉर्न”ही शक्य
- एन. रघुरामन यांचा कॉलम:छोट्या संभाषणातून मोठे परिणाम
- Baramati Crime : बारामतीत लॉजवर पोलिसांची कारवाई, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; ४ मुलींची सुटका
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- केजरीवाल-सिसोदिया यांना दिलासा, ‘आप’ला राजकीय बळ; काँग्रेसला आगामी निवडणुकांची चिंता
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


