पुणे : अजित पवारांविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक; दुचाकींना लावले ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ आशयाचे स्टीकर

पुणे : हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते.तर स्वराज्य रक्षक होते. अस विधान केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात भाजपसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यावरून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली.तरी देखील अजित पवार हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

त्याच दरम्यान आज पुण्यातील बारामती होस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले. तसेच यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आशायाचे स्टीकर अजित पवार यांच्या हस्ते अनेक दुचाकींना लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास भाजप शहर कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. दुचाकी आणि रिक्षावर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’या आशयाचे स्टीकर लावून निषेध नोंदविला. या कृतीमधून राष्ट्रवादी आणि भाजपात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून ‘धर्मवीर की स्वराज्य रक्षक’स्टीकर वॉर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. तर यावेळी अजित पवार यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनाबाबत भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील आजवर वादग्रस्त विधान केली आहेत. त्यानंतर आता महापुरुषां बदल वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी काही म्हणू छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि कायम राहणार असल्याची भूमिका मांडत. त्यामुळे अजित पवार यांच्या विधानाचा आम्ही निषेध व्यक्त करीत असून राज्यातील जनतेची अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply