नाशिक : साहित्य संमेलनाची ‘खटपट’ सुरूच – छगन भुजबळ

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले- पाटील यांनी ‘अक्षरयात्रा’ या नियतकालिकातून नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीका केली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आता यावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले असून, रविवारी (ता. २०) एका कार्यक्रमात त्यांनी, एवढे सगळे झाल्यावर अजूनही खटपट सुरूच आहे. या खटपटीवर झालेल्या टीकेवर लक्ष देत नसल्याचे वक्तव्य केले आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, मेट भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झालेल्या संमेलनाचे नाशिककरांच्या प्रेमामुळे, मदतीमुळे यशस्वी नियोजन करू शकलो. नाशिकच्या संमेलनावर कितीही टीका झाली, कोणी कितीही अन्‌ काहीही बोलले, तरी हे संमेलन पुढील अनेक वर्ष साहित्यिक विसरणार नाहीत.

दरम्यान, लहानपणी झोपडपट्टीतले जीवन, शाळा-कॉलेजचे जीवन, त्यानंतर जीवनातील चढ-उतार, दहा बाय दहा पत्र्याच्या खोलीत राहणारा माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री झाला, हे काही कमी नाही. असंख्य लढाया खेळल्या असून, १९९१ पासून मधला काही काळ सोडला, तर सतत मंत्रिपदावर आहे. सापसिडीच्या खेळाप्रमाणे जीवन झाले असून, लिहायला घेतले तर जवळपास चार ते पाच हजार पानांचे पुस्तक होईल, असेही त्यांनी नमूद केले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply