नाशिक : महापालिका विद्युत खांबांवर मिळविणार जाहिरात कर

नाशिक : महापालिकेने हक्काचे उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेतर्फे मुख्य रस्त्यांवरील विजेच्या खांबांवर जाहिरात फलकाच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी महापालिकेने पुढील दहा वर्षासाठी करार केला आहे.

महापालिका विद्युत खांबांवर ३ बाय २ आकाराचे छोटे जाहिरात फलक लावून महसूल गोळा करणार आहे. नाशिक शहरातील मुख्य रस्त्यावरील सुमारे अडीच हजार खांबांवर असे फलक लावून दर महिन्याला एका खांबापोटी १९६ रुपये महापालिकेला मिळणार आहे. दहा वर्षाच्या महसूल वसुली दरम्यान महापालिका दर दोन वर्षांनी फलकाच्या भाड्यात दहा टक्‍क्‍यांनी वाढ करणार आहे. ‘अ‘ व ‘ब’ शहरात लहान-मोठे असे एकूण ६ हजार विद्युत खांब आहे. यात अ व ब असे वर्ग करण्यात आले आहे. अ वर्गात सुमारे पंचवीसशे विद्युत खांब आहे, तर ब वर्गात सुमारे साडेतीन हजार खांब आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले खांब या वर्गात येतात. शहरातील सुमारे तीस मुख्य रस्त्यांवर हे खांब आहे, तर ब वर्ग अंतर्गत रस्त्यांवर सुमारे साडेतीन हजार खांब आहे.

प्रति खांबावरील जाहिरात करापोटी महिन्याला १९६ प्रति खांबापोटी महापालिकेला कर मिळेल. त्यात दर दोन वर्षांनी १० टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. शासनाचे दर, तसेच जीएसटीची रक्कमदेखील ठेकेदाराला भरावी लागणार आहे. दरम्यान, ब वर्गासाठी अद्याप कोणाचीही बोली आलेली नाही. यामुळे सध्या तरी या वर्गाच्या खांबांवर लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. यामुळे महापालिकेला दर महिन्याला सुमारे २० लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. तर, दहा वर्षात कोट्यवधी रुपये महापालिकेला या नव्या उपक्रमांमधून मिळणार आहे. दरम्यान, ब वर्गाच्या कामांचा लिलाव झाल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply