धुळे : भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत वादग्रस्त विधानाचे धुळ्यात पडसाद

धुळे : भीमा कोरेगाव शौर्य दिनाबाबत करणीसेनेतर्फे वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. या वादग्रस्‍त विधानाचे धुळ्यात पडसाद उमटले असून या विधानाचा निषेध करण्यात आला आहे.

भीम सैनिकांसाठी अभिमानाचा विषय असलेल्या भीमा कोरेगाव या ठिकाणी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो. या शौर्य दिनासंदर्भात करणीसेनेतर्फे वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. याचे पडसाद धुळ्यात उमटले आहेत. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करणी सेनेचे अजय सिंह सिंगर यांच्या प्रतिमेस लाथाळून व प्रतिमा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे,

निषेधकर्त्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून करणी सेनेच्या अजयसिंह सेंगर यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply