दिल्ली: काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे, दिल्ली आणि चेन्नईत छापे

दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा टाकला आहे. सीबीआय पी चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईमधील ७ ठिकाणांवर छापे टाकत आहे. मात्र, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाबाबत आहे, याबाबत सीबीआयकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पी चिदंबरम हे काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा आणि लोकसभा खासदार कार्ती चिदंबरम यांच्याशी संबधितही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या अनेक ठिकाणी (घर आणि कार्यालय) झडती घेत आहेत. सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले की, 'मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? नोंद असावी.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “दिल्ली: काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचे छापे, दिल्ली आणि चेन्नईत छापे

Leave a Reply