जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. सातव व बोरोले यांची गरूडझेप

उंड्री - दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत (World Ironman Competition) बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश सातव-पाटीलआणि विनोद बोरोले यांनी उत्तुंग यश पटकावले. अनुक्रमे १० तास ५८ मिनिटात व १२ तास ४० मिनिटांत पूर्ण करून आयर्नमॅन (Ironman) किताब पटकावला. या स्पर्धेत जलतरण, सायकलिंग व धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश असतो. ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग व ४२.२ किमी धावणे असे सलग वेळेमध्ये (१६ तास, ४५ मिनिटे) पूर्ण करणे बंधनकारक असते.

जागतिक पातळीवर खडतर अशी मानली जाणारी ही स्पर्धा आहे. मांजरी बु।। (ता. हवेली) येथील डॉ. सातव बालरोतज्ज्ञ आहेत. तसेच ते रनहोलिक्स ग्रुपचे संस्थापक असून, या ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेस आणि इंडूरन्स स्पोर्ट्सविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉ. योगेश सातव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रनोहोलिक्स ट्राय ग्रुपचे २० ट्रायएथलिट्स कझाकस्तान येथे होणाऱ्या आयर्नम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply