
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं राजकीय नाट्य सुरु होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर या सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व आमदार अद्याप देखील गोव्यात आहे. पण हे सर्व आमदार आज मुंबईत परतणार आहेत. मुंबईत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज मुंबईत परतणार असल्याचे स्पष्ट केले. हे आमदार गोव्यातून मुंबईकडे यायला निघाले आहेत तर काही आमदार हे स्पेशल विमानाने गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबईत आल्यानंतर शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळ वाटपासाठी चर्चा होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार तब्बल ११ दिवसांनी मुंबईत परत येणार आहेत. गोव्यातील ताज सुरत (गुजरात), गुवाहाटी (आसाम) आणि पणजी (गोवा) अशा तीन राज्यांमधील प्रवासानंतर तब्बल ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पणजीहून मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत. गोव्यातल्या ताज कन्व्हेक्शन या हॉटेलात सर्व आमदारांना ठेवण्यात आलं होतं. यानंतर शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत येत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता हे सर्व बंडखोर गोव्याहून मुंबईला येत आहेत. मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांची बैठक होणार आहेय या बैठकीत शिंदे सरकारमधील खातेवाटप आणि मंत्रिपदासाठी चर्चा होणार आहेत. आज, शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बंडखोर आमदार मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ताज प्रेसिटेंट हॉटेलमध्ये ७ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतच कॅबिनेट आणि मंत्रिपद या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटच्या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे २ आणि ३ जुलैला होणारे अधिवेशन आता ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे अधिवेशन बोलावलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


