अकोला: महिला पोलीस उपनिरीक्षकाची सर्व्हिस गन चोरीला गेल्याने खळबळ

अकोला: सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक या कुटुंबासह लग्नाला बाहेरगावी गेल्या होत्या. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली. घरातून त्यांचे सर्विस रिव्हॉल्वर आणि पाच जिवंत काडतूस हे चोरी गेले आहे. पोलीस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस निवासस्थानात ही चोरी झाली आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशन येथे आज त्यांच्या पतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस निवासस्थानामध्ये झालेल्या या चोरीने एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीस उपनिरीक्षक सविता कुवारे या सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या पोलीस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस निवास्थान येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी लग्नाच्या कार्यक्रमासाठी त्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद असल्यामुळे चोरट्याने त्यांच्या घरात चोरी केली. चोरट्यांनी घरातील दागिने चोरून नेत थेट सर्विस रिवाल्वर आणि जिवंत काडतूस याच्यावरच डल्ला मारला आहे. त्या घरी परत आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्यांच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान पोलीस निवास्थानामध्ये झालेल्या चोरीने पोलीस निवासस्थानाच असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. पोलीस उपनिरीक्षक यांच्या घरी झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी मौल्यवान दागिने चोरी न करता थेट सर्विस रिवाल्वर आणि जिवंत काडतूस चोरी केल्यामुळे भविष्यात मोठी अनुचित घटना घडू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply