Mumbai : मुंबईच्या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज

Mumbai  : मुंबईकर गेले दोन दिवस गुलाबी थंडीचा अनुभव घेत असून मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. तुलनेने उपनगरांतील पारा अधिक घसरला असून उपनगरातील किमान तापमान सोमवारी १४ अंश सेल्सिअस इतके होते.

गेल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशाच्या आसपास आणि किमान तापमान २० अंशापेक्षा अधिक नोंदले जात होते. मात्र, रविवारपासून त्यामध्ये घट व्हायला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १४ अंश सेल्सिअस, तर कुलाबा केंद्रात १९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उपनगरात अनेक ठिकाणी किमान तापमनात घट नोंदवली गेली.

Pune : पालकांनो सावधान…मुलांच्या हातात गाडी देताय ?

पुढील तीन ते चार दिवस तापमानातील घट कायम रहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत किमान तापामन १५ ते १६ अंशदरम्यान राहील. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाट आली असून राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply