MLC Election : विधानसभा झाली, आता परिषदेसाठी नेत्यांची लॉबिंग

 

Mumbai : (MLC Election Maharashtra) नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या जागांसाठी जोरदार राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. विविध पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची निवडणूकीसाठी कंबर कसली असून, आगामी विधानपरिषद निवडणुक अनेक पक्षांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या जागांवर निवडणुका होणार असून, यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचाही समावेश आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. प्रमुख पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू केली आहे, तर काही ठिकाणी युतीच्या शक्यता तपासल्या जात आहे.

Maharashtra Politics : गृहमंत्रिपदामुळे शपथविधी रखडला? महायुतीत पडद्यामागे काय घडतंय? पाहा स्पेशल रिपोर्ट

प्रतिष्ठेची ठरणार विधानपरिषदेची निवडणूक

निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी महायुती सरकारसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. विधान परिषदेत बहुमत वाढवण्यासाठी हे निवडणुकीचे निकाल निर्णायक ठरू शकतात. दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीनेही या निवडणुकांमध्ये जोरदार कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे. विधानसभेच्या निवडणूकीत विशेष कामगिरी दाखविता न आल्याने आता महाविकास आघाडीने सर्व लक्ष विधानपरिषदेच्या निवडणूकांवर केंद्रीत केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि स्थानिक मुद्दे यावर भर देत उमेदवार आपले अभियान राबवणार आहेत. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत स्थानिक नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, विधान परिषदेच्या जागा हे केवळ निवडणुकीचे मैदान नसून पक्षांच्या राजकीय ताकदीचे मोजमापही ठरेल. या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नसल्या तरी, सध्या सुरू असलेल्या हालचालींवरून लवकरच प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. या निवडणुकांचे निकाल महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply