Eknath Shinde : ट्विस्ट संपला! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही या महानाट्यावर पडदा पडलाय. एकनाथ शिंदे अखेरीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय. शपथ घेण्याविषयीचे पत्र घेऊन ते राजभवनावर जाणार असल्याचं माहिती गुलाबराव पाटील यांनी दिलीय.

शपथविधीची निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली की ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर गृहखातं शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी असल्याचंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

Pune : सिंहगड रस्ता भागात वैमनस्यातून युवकावर कोयत्याने वार, गणेशोत्सव मिरवणुकीतील वाद; तीन अल्पवयीन ताब्यात

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झालं होतं. तर महायुतीचा मागील फॉर्म्युला म्हणजेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राहणार असल्याचं निश्चित झालं. याबाबत दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली.

या बैठकीत सरकारचा फॉर्म्युला मात्र गृहमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार असल्यानं एकनाथ शिंदे नाराज होते. दिल्लीतील अमित शहा यांच्यासोबतची बैठक संपवल्यानंतर मुंबईत होणाऱ्या बैठकीआधीच एकनाथ शिंदे दवे गावाला निघून गेले. त्यानंतर ते आजारी असल्याचं सांगण्यात आलं. त्यावरुन भाजपकडून ठेवण्यात आलेल्या फॉर्म्युलावर नाराज असल्याचं दिसून आलं. इतकेच नाही तर अमित शहा यांच्या बैठकीतही त्यांचा चेहरा पडलेला दिसत होता.

मात्र आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही आहोत,असं म्हणत असताना शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी लावून ठेवली. इतकेच नाही तर शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय शिरसाट यांनी उघडपणे गृहमंत्रिपद शिंदे गटाला मिळावं अशी मागणी केली. मात्र भाजप गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नसल्यानं महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे राहणार की नाही याचा सस्पेन्स कायम होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply