IT Raid on BBC : बीबीसीच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, कर्मचाऱ्यांचे फोन जप्त

नवी दिल्ली : बीबीसी कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयात छापेमारीची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप प्राप्तिकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.बीबीसीवरील आयकर विभागाच्या धाडीबाबत काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडलवरुन म्हटलं की, आधी बीबीसी डॉक्युमेन्ट्री आली, त्यावर बंदी घालण्यात आली. आता आयकर विभागाने बीबीसीवर छापा टाकला आहे. ही अघोषित आणीबाणी.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *