नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळ देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात; 13 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ एका खासगी बसला अपघात झाला आहे. बसमधील सर्व भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना बसला अपघात  झाला. या अपघातात 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

बुलडाण्याहून ही बस त्र्यंबकेश्वर येथे जात होती. मात्र बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसला अपघात झाला. बस रस्त्याच्याकडेला जाऊन उलटली. या बसमधील सर्व प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरजवळ ही भाविकांची मिनी बस उलटली आहे. बसमधील 29 पैकी 13 प्रवासी जखमी झाले आहेत. उतारावरून खाली येत असताना संस्कृती हॉटेल पर्यटन केंद्र येथे वाहनावरील नियंत्रण सुटले व बस थेट नाल्यात पलटी होऊन समोरच्या झाडाला अडकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *