
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलंय. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
“आम्ही सध्या रोहित कपूरचा शोध घेत आहोत. याचसंदर्भात दिघेंना समन्स पाठवण्यात आले आहे. दिघे यांच्या कुटुंबियांनी हे समन्स त्यांच्यावतीने स्वीकारलेत. त्यांनी पोलीस तपासात सहकार्य करावं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलंय. पोलिसांचं एक पथक या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या कपूरला पकडण्यासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच प्रकरणामध्ये दिघे यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, तर शिवसैनिकांसह तुमच्या घरावर मोर्चा काढावा लागेल, असं ते म्हणाले. केदार दिघे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”हा शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे. ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल.”
केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


