“पुरंदरेंची भाषणं, लिखाणाने शिवछत्रपतींवर अन्याय केला” म्हणणाऱ्या शरद पवारांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “स्वत:ला…”

“बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही,” असं मत नुकतेच पुण्यातील डॉ.श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावरच सोमवारी एका जाहीर कार्यक्रमातील भाषणात भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही पर्याय द्या,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार २०२२ चे वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. गो. बं. देगलूरकर यांना २०२२ चा श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी लोकांना मान्य होईल आणि पटेल असा पर्याय उपलब्ध करुन द्यावा असं आवाहन पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांना केलं आहे.

“मला या व्यासपीठावरून हेच मांडायचं होतं की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे, त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केलं ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे त्याच्यापासून लोकांना विचलित करतात,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच पुढे पाटील यांनी, “तुम्ही पर्याय द्या. जे आहे ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या. असा पर्याय द्या की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते खरं असेल त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील,” असंही म्हटलं.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *