
ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. पात्रता फेरीसाठी २४ वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी सर्वात पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३.५० मीटर अंतर पार करण्याची आवश्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेदेखील अंतिम फेरी गाठली.
नुकतंच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्समध्ये रौप्य पदक जिंकत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड केला. नीरज चोप्राने ८९.९४ मीटर अंतर पार केलं. ऑगस्ट २०१८मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवलं होतं. त्यावेळी त्याने ८५.७३ मीटर अंतरावर भाला फेकला होता.
तसंच तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावलं. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने ८६.३० मीटर अंतर गाठत सुवर्णपदकाची कमाई केली. फिनलंडमधील या दोन्ही स्पर्धामधील कामगिरीमुळे नीरजच्या हंगामाला सकारात्मक सुरुवात झाली. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे क्युर्टानेच्या स्पर्धेतील तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
अन्नू अंतिम फेरीत ;भारताच्या भालाफेकपटूला सलग दुसऱ्यांदा यश
भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अन्नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर अंतर गाठलं. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हं होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर अंतर गाठलं. जे यंदाच्या हंगामातील तिच्या ६३.८२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होतं.
पारुल अपयशी
महिलांच्या ५००० मीटर शर्यतीत पारुल चौधरीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १५:५४.०३ मिनिटे वेळ नोंदवणाऱ्या पारुलला दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत १७वा क्रमांक, तर एकंदर ३१वा क्रमांक मिळाला. पारुलने यंदाच्या हंगामात १५:३९.७७ मि. आणि कारकीर्दीतील १५:३६.०३ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

