Vikram-S Launching : भारताच्या अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात, देशातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम-एस लाँच

Vikram-S Launching : भारताने आज अंतराळ क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशातील पहिले खाजगी रॉकेट 'विक्रम-एस' यशस्वीपणे आकाशात लाँच केले आहे. 

विक्रम-एस हैदराबाद येथील स्कायरूट एरोस्पेस कंपनीने बनवले असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे आज यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले. आज प्रेक्षेपित करण्यात आलेल्या या मिशनला 'प्रारंभ' असे नाव देण्यात आले. 

'विक्रम-एस' रॉकेटचे नाव भारताचे महान शास्त्रज्ञ आणि इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतातील खाजगी क्षेत्रासाठी ही एक मोठी झेप असल्याचे मत इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरचे (IN-SPACE) अध्यक्ष पवन गोयंका यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी अशा प्रकारे खाजगी रॉकेट लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी बनल्याबद्दल स्कायरूटचे अभिनंदन केले आहे. 

काय आहे विक्रमची खासियत?

  • विक्रम एस एक सब ऑर्बिटल उड्डान घेणार आहे. हे सिंगल स्टेज सब ऑर्बिटल लाँच व्हेइकल आहे. ज्यात तीन कमर्शियल पेलोड्स आहेत.

  • एक प्रकारची टेस्ट फ्लाइट आहे. यात जर यशस्वी झालो तर भारत प्रायव्हेट स्पेस कंपनींमध्ये रॉकेट लाँचिंगसाठी जगातल्या अग्रेसर देशांच्या यादीत समाविष्ट होईल.

  • या रॉकेटद्वारा लहानशा उपग्रहाला पृथ्वीच्या ठरवलेल्या कक्षेत स्थापीत केलं जाईल.

  • स्कायरूट एयरोस्पेसने २५ नोव्हेंबर २०२१ ला नागपूरच्या सोलर इंडस्ट्री लिमिटेड च्या तपासणी व्यवस्थेत पहिल्या थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजन (First 3D Printed Cryogenic Engine)ची यशस्वी तपासणी केली होती.

  • यातलं थ्रीडी क्रायोजोनिक इंजिन इतर क्रायोजेनिक इंजिनच्या तुलनेत जास्त विश्वासार्ह आहे. त्यासोबतच हे ३०-४० टक्के स्वस्त आहे.

  • यात इतर इंधनांऐवजी LNG म्हणजेच लिक्वीड नॅचरल गॅस आणि लिक्वीड ऑक्सिजन (LoX) चा वापर केला आहे. हे स्वस्त आणि प्रदुषण मुक्त आहे.

  • या क्रायोजेनिक इंजिनचं टेस्टिंग करणाऱ्या टीमच नाव लिक्वीड टीम आहे. यात साधारण १५ तरूण वैज्ञानिक सहभागी होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply