Uttarkashi Tunnel Collapse : तब्बल ८० तासांनंतरही मजूर अडकलेलेच; रेस्क्यूसाठीचे अ‍ॅडव्हान्स मशीन्स बसवले; आज पूर्ण होणार ऑपरेशन?

Uttarkashi Tunnel Collapse : उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्यासाठी ८० तासांहुन आधिक वेळापासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन आज चौथ्या दिवशीही सुरुच आहे. अद्याप, मजुरांना बोगद्याबाहेर काढण्यात यश आलेलं नाही. यमुनोत्री हायवेवर धरासू-बडकोटच्या बोगद्यामध्ये मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आता त्यांना वाचवण्यासाठी आधुनिक तत्रांचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान आज कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे तांत्रिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

खराब झालेल्या ऑगर मशिनच्या जागी आता ड्रिलिंगसाठी दिल्लीहून अत्याधुनिक मशीन मागवण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री बचाव कार्यादरम्यान ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर बुधवारी नवी दिल्ली येथून नवीन मशीन मागवण्यात आली. वायुसेनेच्या दोन हर्क्युलस विमानांतून मशीन पार्ट्सची खेप चिन्यालिसौर विमानतळावर पोहोचली. रात्री उशिरा मशिनचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग सिल्क्यरा साइटवर पोहोचवण्यात आला. त्यानंतर सकाळपासूनच मशिन बसवण्याची आणि ट्रायलची तयारी जोरात सुरू आहे. मंगळवारी रात्री बचाव कार्यादरम्यान ऑगर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर बुधवारी नवी दिल्लीहून नवीन मशीन मागवण्यात आली होती.

Ratnagiri News : गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी

सिल्क्यरा बोगद्याच्या ठिकाणी नवीन जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. खोदकाम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. मदत आणि बचाव मोहिमेचे प्रभारी कर्नल दीपक पाटील माहिती देताना म्हणाले की, अमेरिकेत बनवलेले जॅक आणि पुश अर्थ ऑगर मशीन जुन्या मशीनपेक्षा खूप प्रगत आहे, जे जास्त वेगाने काम करेल. आता लष्करी ऑपरेशन टीमही मदत आणि बचाव कार्यात सामील झाली आहे. यासोबतच हवाई दल आणि लष्करही बचाव कार्यात मदत करत आहे.

सिल्क्यरा बोगद्यातील भूस्खलनानंतर आता एनएचआयडीसीएलकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. ज्यामध्ये बचाव कार्यासोबतच बोगद्यातील परिस्थितीवर क्षणोक्षणी लक्ष ठेवले जात आहे. याबाबत माहिती देताना संबंधित एका कर्मचाऱ्याने सांगितले की, या कामासाठी दोन जणांना जबाबदारी देण्यात आली आहे. बोगद्यातील व्हिडीओ कॅमेरा 24 तास परिस्थिती आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवेल. तेथील फोटो देखील काढले जातील.

तर  गिरधारीलाल यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "आम्हाला प्रशासनाचा पाठिंबा आहे. आम्ही यात (बचाव प्रक्रिया) यशस्वी होऊ. मशीन 99.99% बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्वजण ठीक आहेत; त्यांना वैद्यकीय मदतीची गरज नाही. पण तरी देखील, वैद्यकीय पथक इथे उपस्थित आहेत".



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply