देशात विजेचे संकट गंभीर; तब्बल इतक्या वर्षांनी करावी लागतेय कोळशाची आयात

नवी दिल्ली : सध्या देशभरात उन्हाच्या तीव्र झळांमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे वाढलेल्या या विजेच्या वापरामुळे आता देशभरातील विजेचे संकट अधिकचं गडद होत चाललं आहे. त्यामुळेच जवळपास ७ वर्षांनी कोल इंडिया (Coal India) या सरकारी कंपनीने कोळसा आयात केला आहे. याआधी २०१५ साली या कंपनीने आयात केला होता त्यानंतर आता कंपनीवर कोळसा आयात करण्याची वेळी आली आहे.

दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या (Ministry of Energy) म्हणण्यानुसार, सरकारी औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह, स्वतंत्र वीज उत्पादकांना आयात केलेल्या कोळशाचा पुरवठा केला जाईल. तंसच वीज खरेदी कराराद्वारे (PPA) वीज निर्मितीचा वाढलेला खर्च वसूल करण्यासाठी केंद्राने औष्णिक प्रकल्पांना परदेशातून कोळसा आयात करून वीज निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे.

जरी केंद्राने औष्णिक प्रकल्पांना (Thermal Projects) परदेशातून कोळसा आयात करून वीज निर्मिती करण्यास परवानगी दिली असली तरी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कोळशाच्या किमती लाढल्या आहेत. अशात देशात वीजपुरवठा (Power supply) सुरळीत होण्यासाठी कोळसा आयात करणे हे अत्यंत महत्त्वाचं असताना सरकारने थर्मल प्लांटच्या किमती लक्षात घेता हे पाऊल उचलले आहे.

अदानी ग्रीन एनर्जीची (Adani Green Energy) उपकंपनी असलेल्या अदानी हायब्रीड एनर्जीने राजस्थानमधील जैसलमेर येथे ३९० मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू केला आहे. हा देशातील पहिला विंड सोलर हायब्रिड ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.

अदानी ग्रीनचे CEO व्हिएनीज जैन यांनी सांगितलं की, विंड सोलर हायब्रिड ऊर्जा हा आमच्या व्यवसाय धोरणाचा मुख्य भाग आहे. भारताची वाढती हरित ऊर्जेची गरज पूर्ण करणे हा त्याचा उद्देश असून या संयंत्राने भारतीय सौर ऊर्जा महामंडळासोबत २.६९ रुपये प्रति किलोवॅट दराने वीज खरेदी करार झाला असून तो राष्ट्रीय सरासरी वीज खरेदी खर्चापेक्षा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply