Sindhudurg News : कारमधून १० लाखाची रोकड जप्त; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाची कारवाई

Sindhudurg News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून प्रशासन आतापासून अलर्ट मोडवर आले आहे. काही ठिकाणी वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली असून भरारी पथकाने  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली फोंडाघाट येथे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीमध्ये १० लाखाची रोकड पकडली आहे.

लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरअपघात जिल्ह्यातील प्रशासन ॲक्शन मोडवर आलेली आहे. फोंडाघाट पोलीस चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी दरम्यान दहा लाखाची रोख रक्कम व चार चाकी जप्त केली आहे. जिल्ह्यात सद्या विविध ठिकाणी भरारी पथक तैनात करण्यात आले आहेत. जिल्हा बाहेरून किंवा राज्यातून येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

Chalisgaon Accident News : घरी परतणाऱ्या मजुरांच्या गाडीला अपघात; तीन मजूरांचा मृत्यू

जिल्ह्यातील पहिली कारवाई 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली? कोणी आणली? कुठे घेऊन जाण्यात येत होती? याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply