वन विभागापुढे लांडग्यांच्या संवर्धनाचे आव्हान; मूळ प्रजाती नष्ट होण्याची चिन्हे

Pune News : कुत्रा आणि लांडगा यांच्यातील संकराच्या घटना जगभरात घडल्या आहेत. नुकतेच महाराष्ट्रातही पुण्याजवळ संकरित प्रजातीचे ठोस पुरावे आढळले आहेत. जगभरातील लांडग्यांची सर्वात प्राचीन प्रजातीपैकी एक असलेला 'भारतीय लांडगा' या संकरामुळे धोक्यात आला असून त्याचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे असणार आहे.
द ग्रासलैंड ट्रस्टच्यावतीने २०१३-१४ पासून लांडगा आणि कुत्र्याच्या संकरित प्रजाती संदर्भात संशोधन करण्यात वेत आहे. ट्रस्टचे संस्थापक मिहीर गोडबोले सांगतात, "लॉकडाउनच्या दिवसांत आम्हाला पुण्याच्या जवळच पुन्हा एकदा तसाच पिवळसर प्राणी दिसला.

नंतर एक मादीही दिसली, जी दिसत तर लांडग्यासारखी होती, पण तिच्या त्वचेवर पट्टे होते. शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन आणि वनविभागाची परवानगी घेऊन त्यांनी मग या प्राण्याचे केस आणि विष्ठा गोळा केली. त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण केल्यावर हा प्राणी कुत्रा आणि लांडग्याचा संकर असल्याचे सिद्ध झाले."

Weather Update : हायअलर्ट! पुढील काही तास महत्त्वाचे; या ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज


अशा संकराचा वैज्ञानिक अभ्यासातून ठोस पुरावा मिळण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती. द ग्रासलँड्स ट्रस्टसोबतच अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्वहार्यन्मेंट (अत्री) आणि नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजिकल सायन्सेस (एनसीबीएस) यांनी केलेले हे संशोधन जर्नल ऑफ इकॉलॉजी अँड इव्होल्यूशनमध्ये प्रकाशित झाले आहे. हा संकरित प्राणी नव्या पिल्लांना जन्म देऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे.

संकराचा धोका काय?

जंगलातील अशा संकरामुळे लांडग्यांची प्रजाती संकटात सापडू शकते. त्याची वेगळी जनुकीय ओळखच मिटून जाऊ शकते. संकरामुळे एखाद्या प्रजातीचा 'जीन पूल' (जनुकीय वैशिष्ट्ये) पुसट होत जातो. मिहीर गोडबोले सांगतात, "कुत्र्यांमुळे रेबिजसारखे आजार आणि व्हायरसची लागण लांडग्याना होऊ शकते. यातील काही विषाणुचा संसर्ग झाल्याने एखाद्या भागात राहणारे सर्व जगली लाडगे मरून जाऊ शकतात."
संकर होण्याचे कारण?

जनुकीयदृष्ट्या कुत्रा आणि लांडगा हे प्राणी अगदी जवळचे नातेवाईक आहेत. लांडग्यांपासूनच कुत्र्यांची उत्क्रांती झाली. एखाद्या ठिकाणी लांडग्यांची संख्या कमी झाली तर त्यांना नवा जोडीदार मिळू शकत नाही.

अशा वेळी ते कुत्र्यांसोबत संकर करतात. माळरानांवर मानवी हस्तक्षेपात वाढ झाली असून शेती, गुरे चारने, कचरा फेकणे, अशा गोष्टींमुळे ती संकटात आली आहेत. शहरीकरणामुळे भटके कुत्रेही माळरानावर येतात आणि जंगली लांडग्यांसोबत त्यांचा सपर्क वाढतो.

उपाय काय?

भारतीय लाडग्यांच्या सरक्षण किंवा सवर्धनासाठी पुरेसे प्रयन व्हायला हवेत. गोडबोले सांगतात, "राज्याच्या वन विभागाकडे मुळ लाडग्यांच्या सवर्थानासाठी अहवाल सादर केला आहे. प्रथम लांडग्यांची संख्या मोजून, सकर नसलेला भाग निश्चित करावा लागेल. मूळ लाडग्याची ओळख पटवून त्यांच्या संवर्धनासाठी इतर प्रयत्न करावे लागतील." राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील पुणे, गोंदिया, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि सातारा जिल्ह्यात ही संकरित प्रजाती आढळली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply