Pune : ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका, कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड

Pune : वाहनचालक उपस्थित असताना ‘नो-पार्किंग’ किंवा ‘राँग पार्किंग’ची कारवाई केल्यास, त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग) दंड आता घेता येणार नाही. नियमबाह्य पार्किंगवर कारवाई कशी करायची, याबाबत पुणाच्या पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचनाच जारी केल्या असून, त्यामध्ये ही स्पष्टता आणली आहे.

बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर करण्यात येतो. गाड्या ओढून नेण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कारवाई करताना ‘टोइंग व्हॅन’वरील कामगार वाहनचालकांशी अरेरावी करतात, अशा तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी परिपत्रक जारी केले. पोलीस आयुक्तालयात टोइंग करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांची बैठक आयोजिण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.

Prakash Ambedkar : ओबीसी समाजाने काय करावं? लक्ष्मण हाकेंना भेट देत प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला,

या सूचनांनुसार, वाहन चुकीच्या ठिकाणी वा पद्धतीने लावल्याबद्दल होणाऱ्या कारवाईच्या वेळी वाहनचालक उपस्थित असल्यास त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग व्हॅन) खर्च घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक वाहनचालकांना सम-विषम दिनांक पद्धत माहिती नसते. काहीजण बाहेरगावाहून येतात. त्यामुळेही पार्किंगबाबत माहिती नसते. अशा वेळी वाहनचालक कारवाईच्या वेळी उपस्थित असूनदेखील चुकीच्या पद्धतीने गाडी लावण्यासाठी केलेल्या कारवाईबरोबरच टोइंग व्हॅनचा दंडही वाहनचालकाकडून आकारला जातो. आता याला आळा बसेल. शिवाय, सम-विषम दिनांक विचारात न घेता वाहन लावल्याचे आढळून आल्यास टोइंग व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबतची घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी ई-चलन यंत्र आणि वॉकीटॉकी बाळगावी, असेही निर्देश या बैठकीत पोलीस आयुक्तांनी दिले.

नो-पार्किंग दंड (टोईंग चार्जसह)

वाहन प्रकार दंड जीएसटीसह टोईंग चार्ज एकूण दंड
दुचाकी ५०० रुपये २८५ रुपये ७८५ रुपये
चारचाकी ५०० रुपये ५७१ रुपये १ हजार ७१ रुपये


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply