Pune : आमिषांची बदलती रूपे

Pune : निवडणुकांची घोषणा झाली, की मतदारांना आमिषे दाखविण्याचे प्रकार सुरू होतात. प्रामाणिक मतदार या आमिषांकडे लक्ष न देता तटस्थपणे मतदान करतात, तर काही जण आमिषाला बळी पडतात. पूर्वी निवडणुकीची आचारसंहिता हा प्रकारच अस्तित्वात नसल्याने उघडपणे आमिषे दाखविली जायची. पुण्यात तर निवडणुका आल्या, की मंदिरे, पार आणि तालमींच्या जीर्णोद्धाराच्या कामांना वेग यायचा. पूर्वी ही लोकांची एकत्र येण्याची नेहमीची ठिकाणे होती. त्यामुळे त्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी जीर्णोद्धाराची कामे करून मतदारांना खूश केले जात होते.

ही सुविधा देणाऱ्या उमेदवाराला निवडणुकीत जिंकण्याची हमी मिळायची. त्यामुळे जीर्णोद्धाराची कामे जोमाने सुरू झाली, की निवडणुका जवळ आल्या हे समजले जायचे. पुणे नगरपालिका असताना मतदानाची पद्धत निराळी होती. त्या वेळी एका खोलीत मतपेट्या ठेवण्यात येत असत. त्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे समर्थक उभे असत. प्रत्येक मतपेटीवर उमेदवाराचे नाव असल्याने मतदार कोणाला मत देतो, हे समजायचे. त्यामुळे मतांसाठी खुलेआम आमिषे दाखवून मत मिळविले जायचे. काही व्यापारी हे तत्कालीन नगरपालिकेमध्ये निवडून येणे हे प्रतिष्ठेचे समजत असत. त्यामुळे निवडणुकीत ते पैसे खर्च करत असत.

Pune : दीड हजार गुन्हेगारांची झाडाझडती; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

आता उघड आमिषे दाखविणे आचारसंहितेमुळे थांबले असले, तरी मते मिळविण्यासाठी गुप्तपणे कोणत्याही थराला उमेदवार जात असल्याचे दिसते. मंदिरे, पार आणि तालमींच्या जीर्णोद्धाराची जागा आता इमारतींची रंगरंगोटी करून देणे, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फरशा बसवून देणे, सुशोभीकरण करून देणे, सीसीटीव्हीची व्यवस्था करून देणे अशा आमिषांनी घेतली असल्याचे चित्र आहे. एकेक मतासाठी हिंडण्यापेक्षा सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळण्यासाठी ही नामी युक्ती आता उमेदवारांकडून वापरली जाते.

सहली आयोजित करून मतदारांना मोफत पर्यटन घडवून आणण्याचेही प्रकार सुरू असतात. मतदारांना आमिष दाखविण्याचा हा एक प्रकार असतो. महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी मेळावे घेऊन त्यांना भेटवस्तू देत आपलेसे करण्याचे प्रकार तर मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही आमिषे दाखविली जात असल्याने त्यावर कोणतेही बंधने आणता येत नाहीत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आपोआप असले प्रकार थांबतात. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांची पथके नेमण्यात येत असल्याने उघडपणे दाखविली जाणारी आमिषे बंद होतात. सध्या या पथकांकडून शहरात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मोटारींची तपासणी करण्यात येत आहे. रोख रकमेचा हिशेब सांगता आला नाही, तर संबंधित रक्कम जप्त करण्यात येत आहे. बँकांमधील मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर नजर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसू लागला आहे. मात्र, तरीही मतदानाच्या दिवशी काही मतदारसंघांत मतदानासाठी शेवटचा एक तास राहिला, की रांगा लागू लागतात. या रांगांमागील गुपित शेवटपर्यंत उघड होत नाही. हा कशाचा महिमा म्हणायचा?



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply