
Pune : उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळामार्फत मराठी भाषा शिकणाऱ्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीतर्फे पाठ्यपुस्तके पुरवण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. त्यानंतर आता जपानमध्येही मराठी भाषा शिकणाऱ्या पहिली ते पाचवीच्या मुलांनाही बालभारतीकडून पाठ्यपुस्तके पुरवली जाणार असून, मराठी पुस्तकांच्या वाचनाची गोडी लागण्यासाठी ग्रंथालयाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे आता अमेरिकेपाठोपाठ जपानमध्येही मराठी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्याशी शालेय शिक्षण विभागाने ३१ जानेवारी रोजी सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विविध संस्थांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्यामार्फत मराठी शिकत असलेल्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येईल. स्थानिक गरजेनुसार आवश्यकता असल्यास पाठ्यपुस्तकांमध्ये २० टक्के बदल करून देण्याचे अधिकार बालभारतीला असतील.
|
Pune : डावपेचातील मतभिन्नतेमुळे जयंत पाटील यांचा पराभव; शरद पवार यांचे स्पष्टीकरण |
प्रश्नपत्रिका तयार करणे, एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेवर (एससीईआरटी) सोपवण्यात आली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (राज्य मंडळ) असेल. या कराराच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून कोणतेही आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्यामार्फत चालवल्या जात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा प्रसार करणे, त्यांना अभ्यासक्रम, पुस्तके उपलब्ध करून देणे, परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे यांसह कामकाजाचा आढावा, संनियंत्रणासाठी समन्वय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि टोक्यो मराठी मंडळ जपान यांच्या प्रतिनिधींसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे. या समितीकडून दर महिन्याला कामकाजाचा आढावा घेतला जाईल. तसेच आवश्यकतेनुसार शासन मान्यतेने उपक्रमात बदल करण्याचा अधिकार समितीला असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


