Nagpur Crime : नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली 'नको ते धंदे'; पोलिसांकडून परराज्यातील ३ महिलांची सुटका

Nagpur Crime : नागपूरमध्ये  मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. उपराजधानी नागपूरमध्ये देह व्यापाराचा नवा ट्रेंड समोर आला आहे. सलून स्पा सेंटरच्या आडून देहव्यापराचा गोरखधंदा सुरू आहे .

जरीपटका भागात सुरू मॉलमध्ये रिलॅस्क स्पा हेअर अँड ब्युटी लॉजमध्ये परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. आर्थिक मजबुरीचा फायदा घेत देहव्यापार  चालवला जात होता. यात पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तीन पीडित महिलांची सुटका केली आहे.

Pune Accident News : लोणीकंद-थेऊर अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; तिघे मृत्यूमुखी, एकाची मृत्यूशी झुंज

याप्रकरणी पोलिसांनी देहव्यापार  चालवणाऱ्या रक्षा शुक्ला नामक महिलेला ताब्यात घेतलं आहे. तिच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणात समावेश असलेल्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे. यात मोहम्मद नासीर अब्दुल शकुर भाटी आणि फिरोज अब्दुल शकुर भाटी अशी फरार आरोपींची नावे आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ महिलांची सुटका केली आहे.

हे तिघेही आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याप्रकरणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच जरीपटका येथील जिंजर मॉलमधील रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्यूटीवर धाड  टाकली. यावेळी या स्पामध्ये  आलिशान रूम कंपार्टमेंट तयार करून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पीआय सामाजिक सुरक्षा विभाग नागपूर कविता इसारकर यांनी दिली आहे. आयटी सीटी हिंजवडीत देखील अशीच एक घटना काल उघडकीस आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply