
Mumbai Pollution : एकीकडे मुंबईचा प्रदूषण वाढतंय तर दुसरीकडे पूर्व उपनगरात कांजुरमार्ग डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सगळ्या विरोधात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरणवाद्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिवसाला जवळपास 5 हजार मेट्रिक टन इतका कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये येतोय आणि त्यामुळे विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत (Mulund) प्रदूषण तर वाढलेच शिवाय या संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी मागील अनेक दिवसांपासून पसरलेली पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणाहून प्रवास करताना कारची काच खाली करून प्रवास करावा अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
106 हेक्टर परिसरात हे कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड पसरलेला आहे. आजूबाजूला कांदळवन, पूर्व द्रुतगती मार्ग आणि लगतच विक्रोळी भांडुप कांजूरमार्ग नाहूरचा रहिवासी भाग आहे. रोज या डम्पिंग ग्राउंडमध्ये मुंबईतील 5000 मॅट्रिक टनपेक्षा अधिक कचरा टाकला जात आहे. या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट बायोरिऍक्टर पद्धतीने केली जात असताना ओला आणि सुका कचरा याचं कुठलंही वर्गीकरण केलं जात नसल्याचं पर्यावरणवाद्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रदूषणांविरोधात तातडीने ॲक्शन मोडमध्ये काम करण्यात यावं यासाठी पर्यावरणवाद्यांनी थेट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
कचऱ्याचे वर्गीकरण नाही...डम्पिंगमुळे प्रदूषणात वाढ
ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने इथेच तो कुजतो आणि त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय मिथेन वायूचा थर जमा होत असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन यांनी म्हटले. विक्रोळीपासून ते मुलुंडपर्यंत या डम्पिंग ग्राउंडचा दुर्गंधीचा वास पसरत असल्याने सुगंधी द्रव्याची फवारणी या दुर्गंधी पासून मुक्तता व्हावी म्हणून मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मात्र, ही फवारणी करूनसुद्धा दुर्गंधी जात नसल्याने आजारांचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिकांचे म्हणणे आहे.
दुर्गंधी कशी पसरतेय हे आपण पाहतोय. मुख्यमंत्री जेव्हा ठाण्याला जातात तेव्हा त्यांनी एकदा या ठिकाणाहून जाताना आपल्या कारची काच खाली करावी आणि त्रास बघावा, अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक मामा मांचेकर यांनी दिली.
घरांसाठी कोट्यवधी मोजले, पण दुर्गंधीने त्रास वाढवला...
या भागात राहता यावं यासाठी करोडो रुपये खर्च करून उच्चभ्रू सोसायटीमध्ये लोकांनी घर घेतली. मात्र, करोड रुपये खर्च करून सुद्धा अशा दुर्गंधीमध्ये या लोकांना राहावं लागत असल्याने वारंवार तक्रारी या स्थानिकांकडून केल्या जात आहेत. हे डम्पिंग ग्राउंड तळोजाला हलवण्याचे मध्ये योजले असताना नंतर कुठले हालचाली झाल्या नसल्याची माहिती आहे. तर अनेक लेखी तक्रार येऊन सुद्धा सुगंधी द्रव्यची फवारणी मारून या तक्रारीकडे मुंबई महापालिकेकडून काना डोळा केला जात असल्याची तक्रार आहे.
दीड ते दोन कोटी रुपयांना या चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतले मात्र ज्या प्रकारे दुर्गंधी येते ते पाहता जेवण सुद्धा जात नाही. अनेक जण आजारी आहेत प्रदूषण मुंबईची वाढले आहे तक्रारी करून सुद्धा कुठली ॲक्शन घेतली जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली.
मुंबई प्रदूषण वाढत असताना वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलीही हालचाल प्रशासनाकडून होत नसल्याने या त्रासात स्थानिकांना राहावं लागते त्यामुळे तातडीने प्रशासनाने या सगळ्याची दखल घ्यावी आणि यातून मुक्तता करावी हीच अपेक्षा आता या सर्व स्थानिकांची आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


