Mumbai : एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर,मेट्रोसह अनेक प्रकल्पांना गती

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२५-२६ वर्षासाठीच्या ४०,१८७.४१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शुक्रवारी उपमुख्यमंत्री,नगर विकास मंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.हा अर्थसंकल्प ३,२४८.७२ कोटी इतक्या तुटीचा आहे. तर या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ४०,१८७.४१ कोटींच्या अर्थसंकल्पातील ८७ टक्के अर्थात ३५,१५१.१४ कोटी रुपयांची तरतूद पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. मेट्रो, सागरी सेतू, दुहेरी बोगदा प्रकल्प, उन्नत रस्ते यासह अन्य प्रकल्पांना चालना देण्याच्यादृष्टीने प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर अर्थसंकल्पीय अंदाजात २०२५-२६ साठी ३६,९३८.६९ कोटी रुपयांच्या महसूलाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार्या एमएमआरडीएकडून एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेकविध प्रकल्प राबविले जात आहेत. यात मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्ता, उड्डाणपूल, दुहेरी बोगदे अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. तेव्हा सध्या एमएमआरडीएकडून सुरु असलेल्या प्रकल्पांसह या वर्षात सुरु होणार्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. त्यानुसार चालू मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाळे) प्रकल्पासाठी २,१५५.८० कोटी रुपयांची, मेट्रो ४ (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) प्रकल्पासाठी ३,२४७.५१ कोटी रुपयांची, मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) प्रकल्पासाठी १,५५७९.९९ कोटी रुपयांची, मेट्रो ६ (स्वामी समर्थनगर-कांजूरमार्ग) प्रकल्पासाठी १,३०३.४०कोटी रुपयांची, मेट्रो ९ (दहिसर-मिरा-भाईंदर) आणि मेट्रो ७ अ (अंधेरी ते विमानतळ) प्रकल्पासाठी ११८२.९३ कोटी रुपयांची तर मेट्रो १२ (कल्याण-तळोजा) प्रकल्पासाठी १.५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Pune : शाळा आता सकाळच्या सत्रात; का देण्यात आले निर्देश?

विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी ५२१.४७ कोटी रुपयांची, ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्यासाठी २,६८४ कोटी रुपयांची, आॅरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्यासाठी १,८१३.४० कोटी रुपयांची, उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पासाठी २००० कोटी रुपयांची, प्रादेशिक स्तरावर जलस्त्रोत विकास प्रकल्पासाठी १६४५ कोटी रुपयांची, गायमुख ते फाऊंटन हाॅटेल जंक्शन भुयारी मार्गासाठी १,२०० कोटी रुपयांची, फाऊंटन हाॅटेल ते भाईंदर उन्नत रस्त्यासाठी १००० कोटी रुपयांची तर तिसर्या मुंबईसाठी अर्थात नवनगरसाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू आणि या वर्षात बांधकामास सुरुवात होत असलेल्या प्रकल्पांसह अनेक नवीन प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार दुर्गाडी ते उल्हासनगर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गायमुख ते शिवाजी चौक (मिरारोड) मेट्रो १०, शिवाजी चौक ते विरार मेट्रो १३, कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ यासह अन्य काही प्रकल्प या वर्षात मार्गी लागणार आहेत. एकूण अर्थसंकल्पाच्या ८७ टक्के निधी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी खर्च करण्यात येणार असून ही बाब समाधानकारक आहे. तर एमएमआरचा विकास जागतिक दर्जाचे आर्थिक विकास केंद्र अर्थात ग्रोथ हब म्हणून करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्रशासकीय खर्च रु. ३७३.९५ कोटी

प्रकल्प देखभाल व संचालन खर्च रू. ६१९.९५ कोटी

कर्मचारी वर्गास अग्रोम व कर्ज रू.११ कोटी

कर्ज आणि अग्रीम रू. १०१ कोटी

सर्वेक्षणे / अभ्यास रू. ३३६.५५ कोटी

अनुदाने रू. २९९.७५ कोटी

प्रकल्पावरील खर्च रू. ३५,१५१.१४ कोटी

कर्जाऊ रकमा परतफेड रू. ४८८.६० कोटी

कर्जाऊ रकमेवरील व्याज व इतर शुल्क रू. २,८०५.३७ कोटी

अपेक्षित उत्पन्न

राज्य शासनाकडून मिळणारे दुय्यम कर्ज रू. २,०८२ कोटी

जमिनीची विक्री रू. ७,३४४ कोटी

कर्जाऊ रकमा रू. २२,३२७.३५ कोटी

नागरी परिवहन रू. ३००० कोटी

एकूण रू. ३६,९३८.६९ कोटी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply