Maharashtra Budget Session 2023 : विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होणार; सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आखली रणनीती?

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक शेतकरी मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक होणार आहे. 

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून आक्रमक होणार आहे. सध्या राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्याची वेळ आली आहे. ती बंद व्हावी यासाठी दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून द्या, तसेच राज्यभरात सुरू असलेल्या वीज तोडणी तत्काळ बंद करा या मागणीसाठी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक होणार आहे.

दरम्यान, दिवसभराच्या कामकाजामध्ये देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरप मधील हानिकारक घटक द्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. हीच बाब लक्षात घेत राज्यातून निर्यात होणाऱ्या औषधांसंदर्भामध्ये गुणवत्ता तपासणी प्रमाणपत्र घेण्याचा प्रमाण कमी असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply