MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी


MahaKumbh 2025 : प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान पार पडलं. मिरवणुकीतून आलेल्या हजारो सांधूनी पवित्र नदीत डुबकी मारली. 13 आखाड्यांच्या साधू-महतांनी स्नान केल्यानंतर भाविकांनीही संक्रातीची पर्वणी साधली. पाहूया एक रिपोर्ट. हाकुंभमेळ्यातलं पहिलं अमृतस्नान हर..हर महादेव अशा जयघोषात पार पडलं. हातात तलवार-त्रिशूल, डमरू आणि अंगावर राख फासलेले नागा साधू संगमावर पोहोचले.

हत्ती, उंट, रथावरुन काही साधू घाटावर आले. या साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावर गर्दी केली. सर्वात आधी पंचायती निर्वाणी आखाड्याचे साधू स्नानासाठी बाहेर पडले. सकाळी 5.15 वाजता त्यांनी शिबिर सोडले आणि 6.15 वाजता घाटावर पोहोचले. त्यानंतर 13 आखाड्यांचे साधू एक-एक करुन स्नानासाठी बाहेर पडले. सर्व आखाड्यांना अमृत स्नानासाठी 30-40 मिनिटांचा वेळ देण्यात आला.

Pune News : पैसे मिळाले नाहीत, चोरांनी लॉलीपॉपवर मारला ताव, घटना सीसीटीव्हीत कैद

यावेळचा महाकुंभ केवळ भारतीय भाविकांसाठीच नाही तर परदेशी पर्यटक आणि भाविकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. महाकुंभ ही एक दुर्मिळ घटना आहे जी 12 पूर्ण कुंभानंतर म्हणजेच 144 वर्षांनंतर येते. म्हणूनच या कार्यक्रमाला महाकुंभ म्हणतात. हे फक्त प्रयागराजमध्ये आयोजित केले जाते, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम होतो.महाकुंभमेळ्या आता पुढील शाहीस्नान आणि अमृतस्नान कधी होणार ते पाहूयात..

शाहीस्नान आणि अमृतस्नान कधी?

मौनी अमावस्या : 29 जानेवारी

वसंत पंचमी : 3 फेब्रुवारी

माघी पौर्णिमा: 12 फेब्रुवारी

महाशिवरात्री : 26 फेब्रुवारी

या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि पापांचे प्रायश्चित्त होते, असे मानले जाते. सनातन धर्माच्या रक्षणासाठी शंकराचार्यांनी आठव्या शतकात आखाडा परंपरा सुरू केली. एकूण 13 आखाडे आहेत. जे महाकुंभासाठी येतात आणि आपले तळ ठोकतात. स्नानाच्या महत्त्वाच्या तारखांना हे आखाडे हत्ती, घोडे आणि उंटांसह भव्य मिरवणूक काढतात.

त्यांच्याशी संबंधित संत, तपस्वी आणि नागा साधू 17 अलंकार परिधान करून संगम काठावर येतात आणि स्नान करतात. ज्याला अमृत, राजसी किंवा शाही स्नान देखील म्हणतात. आखाड्यात स्नान करूनच सामान्य लोक संगमात डुबकी मारतात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply