Maha Vikas Aghadi : वंचितला पाच ते सहा जागा सोडण्यासाठी पवार-ठाकरे आग्रही, काँग्रेस आणि राऊत मात्र तीनच जागेवर ठाम

 

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोडं अडल्याची चर्चा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना पाच ते सहा जागा द्याव्यात अशा मताचे आहेत. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे वंचितला तीनच जागा द्यायच्या मताचे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायच्यात यावरून महाविकास आघाडीत दोन गट असल्याचं दिसतंय.9 मार्च रोजी महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मविआची आणखी एक बैठक होऊन येत्या पाच ते सहा दिवसांनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Mhada Lottery : पुण्यात घराचं स्वप्त पूर्ण होणार; म्हाडाकडून 4777 घरांसाठी सोडत जाहीर, कसा कराल अर्ज?

दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितला किती जागा द्यायच्या यावर 14 किंवा 15 मार्चच्या सांगलीतील सभेपूर्वी अंतिम निर्णय घ्यावा असा अप्रत्यक्ष अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply