Madhya Pradesh Bus Accident : मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बस पुलावरुन कोसळली, 15 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 15 प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर स्थानिक आणि पोलिसांडून बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात खरगोनहून इंदूरला जाणारी प्रवासी बसला मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही बस पुलाचा संरक्षण कठडा तोडून नदी कोसळली. 50 फूट उंच पुलावरुन ही बस नदीमध्ये कोसळली. ऊन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसंगा पुलावर हा अपघात झाला. या अपघातात बसमधील 15 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण आहे की बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी शिवराज सिंह वर्मा, एसपी धरमवीर सिंह, खरगोनचे आमदार रवी जोशी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, खरगोन बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मध्य प्रदेश सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 25,000 रुपयांची तत्काळ आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply