Leopard Attack : वरवंड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ, हल्यात चार मेंढ्या ठार

वरवंड  : दौंड तालुक्यात बिबट्याची दहशत वाढलीचालली आहे. वरवंड (ता. दौंड) येथील कातोबानगर- शिवणकर भागात गुरुवारी (ता. २९) बिबटयाने पहाटे चांगलाच धुमाकुळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परीसरातील नागरिकांचा थरकाप उडाला आहे. याभागात बिबट्याचे पाळीव जनावरांवर हल्ले वाढत चालल्याने वनविभागाने तत्काळ पिंजरा लावुन बिबटयाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

दौंड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांचा दिवसेंदिवस वाढता अधिवास नागरीकांची डोकेदुखी बनत चालला आहे. वरवंड परीसरात मागील काही दिवसापासून शिवणकरवस्ती भागात बिबट्याचा अधिवास आहे.
मागील महिन्यात बिबट्याने विकास शिवणकर यांच्या मेंढीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. त्यांनतर वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात बिबट्या दिसून आला. वनविभागाने घटनास्थळी येऊन लोकांमध्ये जनजागृती करून वेळटाळून नेली.

Nashik Mumbai Expressway : नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीचे काम केव्हा पूर्ण होणार? मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं

त्यानंतर बिबट्याने रामा पिसे यांच्या मेंढीवर हल्ला केला. यामध्ये मेंढी जखमी झाली. त्यानंतर बिबट्याचे अनेक भागात दर्शन घडले. गुरुवारी (ता.२९) याची पुन्हा प्रचिती आली. कातोबा नगर भागांत शिवाजी सर्जेराव दिवेकर यांचे घर आहे.
घराच्या पाठीमागे मेंढ्यां बांधल्या होत्या. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने पहाटेच्या सुमारास मेंढ्यांवर हल्ला केला. यामध्ये चार मेंढ्यांचा मृत्यू झाला. सकाळी दिवेकर यांच्या हा प्रकार लक्षात आले. परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले.

बिबट्याच्या हल्ल्या नंतर परिसरात खळबळ उडाली. या भागात लोकवस्ती आहे. लहान मुले, वयोवृद्ध यांची संख्या आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण झाले. याबाबत नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधला.

दरम्यान, वनविभागाने नुसती जनजागृतीचा फार्स न करता नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा. अशी मागणी जोरधरू लागली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply