Khadakwasla Project : खडकवासला प्रकल्पांत ४.१६ टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस

पुणे - पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणामध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता. २७) ४.१६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

हा पाणीसाठा सोमवारच्या (ता. २६) तुलनेत ०.४ टीएमसीने कमी झाला आहे. दोन दिवसांपासून पाऊस सुरु झाला असला तरी धरणांमध्ये पाणी साठण्यास सुरवात झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.

खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये २७ जून २०२२ अखेरपर्यंत ३.१६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा या चार धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्यात गेल्या १० दिवसांत ०.६३ टीएमसीने (सुमारे पाऊण टीएमसी) तर, गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत सुमारे साडेपाच टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे.

या चारही धरणांत ९ मे २०२३ रोजी ९.७८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर महिनाभराच्या खंडानंतर म्हणजेच १६ जून २०२३ रोजी आणखी कमी होऊन तो केवळ ४.८२ टीएमसी इतका झाला होता. गेल्या १० दिवसांत ०.६३ टीएमसी म्हणजेच पाऊण टीएमसी पाणी कमी झाले आहे.

यावरून दीड महिन्यात या धरणांमधील ५.५८ (सुमारे साडेपाच टीएमसी) पाणी कमी झाले आहे. खडकवासला प्रकल्पात धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.१४ टीएमसी इतका आहे.

Pune Crime : आंबेगावमध्ये विवाहित महिलेवर प्रियकराच्या ४ मित्रांकडून सामूहिक अत्याचार; जंगलात भेटायला गेल्यावर घडलं भयंकर

एक टीएमसी म्हणजे किती?

एक टीएमसी एक म्हणजे अब्ज घनफूट पाणीसाठा. एका टीएमसीमध्ये २८ अब्ज लिटर (दोन हजार ८०० कोटी लिटर) इतके पाणी असते.

टीएमसी हा पाणी मोजण्याच्या युनिटच्या इंग्रजी भाषेतील शब्दांमधील आद्याक्षरांचे संक्षिप्त रुप (लघुरूप) आहे. यानुसार एक टीएमसी म्हणजे एक थाऊजंड (टी.) मिलियन (एम.) क्युबिक (सी.) असे या संक्षिप्त रुपाचा अर्थ आहे.

पाणलोटात ९८ मी.मी. पाऊस

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात फक्त ९८ मिलिमीटर पाऊस झाला.

यापैकी टेमघर धरणाच्या पाणलोटात ३५ मिमी, वरसगावच्या पाणलोट क्षेत्रात ३१, पानशेत २८ आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार मिमी पाऊस झाला. धरणांत पाणीसाठा होण्यासाठी हा पाऊस पुरेसा नसल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply