Khadakpurna River : खडकपूर्णा नदीत नैसर्गिक किमया; पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो रांजणखळगे निर्मिती

Khadakpurna River : खाऱ्या पाण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सरोवरासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणारपासून अवघ्या २१ किलोमीटर अंतरावर खडकपूर्णा नदीचे पात्र आहे. या नदी पात्रात नैसर्गिकरीत्या तयार झालेले 'रांजन खळगे' पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भल्यामोठ्या खडकाला अर्धगोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होत आहे. यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळे रूप पाहण्यास मिळत आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीचे पात्र एका टेकडीला वळसा घालत असल्याने येथे विशिष्ट भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक खळग्यांचे सौंदर्य आणि त्यामधून वाहणारे निर्मळ पाणी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. भविष्यात लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हा परिसर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

Ulhasnagar : पेट्रोलपंपावर हेराफेरी? १२० रुपयात दिलं जातं अर्धा लिटर पेट्रोल, ग्राहकाने उघड केला प्रकार

हजारो वर्ष लागल्याचा अंदाज खडकपूर्णा नदी पात्रातील बेसॉल्ट खडकांमधील ११ खोलगट भागात अडकलेले दगड पाण्याच्या प्रवाहामुळे सातत्याने गोल फिरत राहतात. याच प्रक्रियेमुळे या भागात अर्धगोलाकार खड्ड्यांचे रूपांतर रांजन खळग्यांमध्ये झाले आहे. यासाठी हजारो वर्षे लागली असल्याचा अंदाजे भूवैज्ञानिक व्यक्त करतात. हि प्रक्रिया सातत्याने घडत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रंजन खळगे तयार होत आहेत.

रांजन खळग्यांची निर्मिती कशी झाली? खडकपूर्णा नदीच्या प्रवाहात विशेषतः पावसाळ्यानंतर मोठमोठे गोलसर खळगे तयार होतात. त्यांना 'रांजन खळगे' म्हणतात. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले दगड या खळग्यांमध्ये अडकून गोलसर फिरत राहतात. दगडांच्या सततच्या घर्षणामुळे हजारो वर्षांमध्ये या खळग्यांची निर्मिती झाली असावी. काही खळगे खोल आणि विस्तीर्ण असून त्यामध्ये पाणी वर्षभर टिकून राहते. हे रांजणखळगे पर्यटन केंद्र म्हणून पुढे येऊ पाहत असल्याची चर्चा लोणार परिसरात आहे.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply