KDMC च्या हद्दीत ८ बोगस शाळा, सर्वेक्षणांतून धक्कादायक माहिती समोर

KDMC : कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेच्या हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पालिकेच्या सर्वेक्षणात टिटवाळा परिसरात सर्वाधिक बेकायदेशीर शाळा असल्याचे उघड झाले आहे. पालकांनी या शाळांमध्ये मुलांना दाखल करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. संबंधित शाळांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे.

मार्च महिन्यापासून शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होते. याच पार्श्वभूमीवर केडीएमसी महापालिकेच्या शिक्षण विभागाने तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत महापालिकेच्या हद्दीत ८ प्राथमिक शाळा शासनाच्या परवानगीशिवाय सुरु असल्याचे स्पष्ट झाले. या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेले नाही, त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे आवाहन महापालिकेचे उपआयुक्त संजय जाधव यांनी केले आहे.

कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महानगरपालिका हद्दीत बेकायदेशीर पद्धतीने सुरु असलेल्या आठ शाळांची यादी जाहीर केली. यादीत सर्वाधिक शाळा म्हणजेच सात शाळा टिटवाळा परिसरातील आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शासकीय मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे.

Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, चौघांच्या सामूहिक आत्महत्येने भिवंडी हादरले

बेकायदेशीर शाळांची यादी -

१. एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

२. सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा

३. संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

४. पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा

५. पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा

६. डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम

७. ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली पश्चिम

८. बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली पश्चिम

केडीएमसी महानगरपालिकेची ही मोहीम अशीच सुरु राहणार असून यानंतरही अशा शाळा निदर्शनास आल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई होईल असा इशारा पालिकेने दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply