Katraj- Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रुंदीकरणाला सर्वोतोपरी मदत करणार! पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांचे आश्वासन

Katraj- Kondhwa Road : कात्रज - कात्रज चौकातील ११०० मीटर उड्डाणपूल पुढे गोकुळनगरपर्यंत १३०० मीटर वाढविण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या अधिक निधीची गरज आहे. तसेच, कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी जागा मालकांना योग्य मोबदला देऊन भू-संपादन व अन्य कामाला गती देण्याच्या सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला दिल्या. यावेळी कात्रज-कोंढवा रुंदीकरणाला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक प्रकाश कदम यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून पवार यांनी अधिकाऱ्यांसह कात्रज चौकातील उड्डाणपूल व कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी केली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंत्या श्रुती नाईक, सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, उपअभियंता धनंजय गायकवाड, प्रतिक कदम, उदयसिंह मुळीक, संदीप बधे उपस्थित होते.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होते. पुढील पन्नास वर्षाचा विचार करून नियोजन करावे लागेल. भूसंपादनासाठी बधे, धारिवाल या जागा मालकांनी सहकार्य केले. तसेच, इतरांनी देखील करावे, महापालिका योग्य मोबदला देईल.

Ramayana Mahotsav : ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन

राज्य सरकारकडून मिळणार असलेल्या २०० कोटींचा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित केला असता पालिकेने प्रस्ताव पाठवला असून कॅबिनेट मान्यतेसाठी येईल. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावू असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री यांनी रस्त्याची पाहणी असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच, राजस सोसायटी चौकातून पुढे उड्डाणपूल वाढविण्यासंदर्भात आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खडीमशीन चौकातून पुढे रस्ता रुंद करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी जागांचा ताबा देण्याऱ्या कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कोंढवा भागासाठी एकेरी वाहतूक

एसबीआय बँक ते खडीमशीन चौक या भागात एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. खडीमशीन चौकातून कात्रजकडे येण्यासाठी डावी बाजू म्हणजेच नवा रस्ता तर जाण्यासाठी उजव्या बाजूचा म्हणजेच जुना रस्ता वापरण्यात येणार आहे. एकरी वाहतूक केल्यामुळे कामाला गती देण्यासाठी फायदा होणार असून तीन ठिकाणी होणाऱ्या भुयारी मार्गांचे काम एकाच वेळी करता येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply