Kanhaiya Kumar : कन्हैयाकुमार यांचे तिकीट कट

Kanhaiya Kumar :  मागील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरत २ लाख ६९ हजारांपेक्षा अधिक मतदान घेऊन दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार यांच्यासाठी कॉंग्रेसला एकही जागा शोधता आली नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सक्रिय सहभाग घेऊनही बेगुसराय येथील एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार यांची निवडणूक लढण्याची शक्यता मावळली.

UP Lok Sabha : वरून गांधींना तिकीट देणार अखिलेश यादव? मायावतींशी युतीबाबत सपा अध्यक्षांनी केलं मोठं वक्तव्य

या ठिकाणी राजद आणि माकप हे जागा वाटप करत असताना कॉंग्रेसने मौनाचीच भूमिका ठेवली, असा आरोप कन्हैयाकुमार समर्थकांनी केला आहे. मागच्या निवडणुकीत बेगुसराय येथून भाजपचे दिग्गज नेते गिरीराज सिंह यांच्याविरोधात कन्हैय्या कुमार यांना मैदानात उतरविले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा माकपला मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply