Kalyan Crime : पार्सलचे पैसे मागितल्याने ढाबा चालकावर शस्त्राने हल्ला; वाद सोडवण्यास गेलेला तरूण जखमी

Kalyan Crime :  ढाब्यावरून जेवणाचे पार्सल घेतले. ढाबा चालकाने या पार्सलचे पैसे मागितले असता तरुणांनी आम्ही पैसे देणार नाही असे सांगत ढाबाचालकाशी वाद घातला. यामुळे राग आलेल्या तरुणाने चॉपरने ढाबा चालकावर हल्ला केला. तर हे भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाची देखील बोटे छाटली गेली. हा प्रकार कल्याण पूर्वेतील विश्वास ढाब्यावर घडला आहे.
 
कल्याण  पूर्वेतील ढाब्यावर मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरीष महर, शुभम देवमनी हे चौघे जेवण करण्यास गेले होते. मात्र या तरुणांनी जेवण न करता पार्सल घेतले. ढाबा मालक विश्वास जोशी यांनी मजहरकडे पार्सलचे पैसे मागतिले. तर संतापलेल्या मजहरने आम्ही भाई आहोत, कुठेही पैसे देत नाही; असे सांगत विश्वास जोशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. विश्वास याने बिल द्या अन्यथा पार्सल घेऊ जाऊ नका असे सांगितले, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच दरम्यान मजहरने चॉपर काढला. 
 
वाद होत असल्याचे पाहून विश्वास याचे भाऊ गणेश त्याठिकाणी आले. मजहर यांनी हातातील चॉपर उगारुन विश्वास यांच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणेश यांनी चॉपर अडविला. या झटापटीत गणेशची एक बोट छाटले, तर चारही बोटे रक्तबंबाळ झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गणेश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत मजहर शेख, कुणाल गायकवाड, हरीष महर, शुभम देवमनी या चारही जणांना ताब्यात घेतले आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply