Jalgaon News : पाण्याची मोटार सुरु करताना विजेचा जोरदार झटका; वृद्धाचा मृत्यू

Jalgaon : दोन दिवसांनंतर शहरात पाणी पुरवठा होत असल्याने पाणी लवकर भरावे, यासाठी पाण्याचा मोटरचा वापर केला जात आहे. दरम्यान नळाला पाणी आल्याने मोटार लावत असताना विजेचा जोरदार झटका बसला. यात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरात घडली आहे. सदरची घटना २१ जुलैला सायंकाळच्या सुमारास घडली.

जळगाव  शहरातील जिल्हा पेठ परिसरातील सुधीर गोवर्धन महाजन (वय ७०) असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान सुधीर महाजन हे रविवारी सायंकाळी टाकी भरण्यासाठी मोटार सुरु करत होते. यासाठी मोटारीचे बटन दाबत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. विजेचा झटका बसल्याने ते दूरवर फेकले गेले. सदर घटना घरातील मंडळींच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Pooja Khedkar: खेडकर प्रकरणामुळे दिल्ली 'अस्वस्थ'? प्रशासकीय अधिकाऱ्यांसह भाजप नेते चिंतातुर

कुटुंबीयांचा आक्रोश रुग्णालयात नातेवाईक तसेच कॉलनीतील नागरिकांनी गर्दी केली होती. सुधीर महाजन यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घरातील वडीलधारी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply