Jaipur-Mumbai Train Firing Update : जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार प्रकरण, चौकशीसाठी समितीची स्थापना; मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

Mumbai : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च स्थरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ५ जणांचा समावेश असणार आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करणार आहेत. तसंच या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणाची आता उच्च स्थरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे पी. सी. सिन्हा, अजोय सधन्य, नरसिन्ह आणि मध्य रेल्वेचे जे पी रावत, प्रभात या पाच जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचसोबत या गोळीबारामध्ये मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आयएसए टिकाराम यांना  सरकारी  नियमांनुसार मोबदला मिळणार आहे.

Pune PMPML Bus Accident : पुण्यात PMPMLच्या २ बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात २९ प्रवासी जखमी; पुणे-नगर महामार्गावरील घटना

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. आरपीएफ जवान चेतन सिंहने धावत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यासह प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. दहिसर ते मीरारोड रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली होती. या गोळीबारामध्ये आरपीएफ पोलिसासह चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रेनच्या लोको पायलटने तात्काळ ट्रेन थांबवली.

रेल्वे पोलिसांनी आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंहला अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चेतन सिंह याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक संतुलनावर उपचार घेत आहे. त्याचसोबत आरोपीला निद्रानाशाचा देखील त्रास होत असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर बोरीवली येथील भगवती रुग्णालयात उपचार सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply