HMPV Virus : बापरे! मुंबईमध्ये HMPV चा रूग्ण आढळला, ६ महिन्यांच्या बाळाला लागण

 

HMPV Virus : HMPV व्हायरसने देशात एन्ट्री केलीच होती. मात्र आता त्याने मुंबईत देखील एन्ट्री केल्याची माहिती आहे. HMPV चा एक रूग्ण मुंबईत सापडला आहे. एका ६ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बाळावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV ने भारताच्या चिंता वाढवल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 8 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून या विषाणूचा मुंबईतही शिरकाव झालाय. मंगळवारी नागपूरमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती होती. दरम्यान आता या पार्श्वभुमीवर सरकार अलर्ट मोडवर आलं असून जे. जे हॉस्पिटल्सच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीये.

Pune News : रिंग रोडसाठी ९० टक्के भूसंपादन, भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत शिक्कामोर्तब होणार

 


HMPV ची लक्षणं

सर्दी

खोकला

ताप

घसा खवखवणे

धाप लागणे

जुलाब

अंगावर पुरळ

काय करू नये?

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळलं पाहिजे

हस्तांदोलन करू नये

सार्वजनिक ठिकाणी अजिबात थुंकू नका

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply