Employee Strike : मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही संपातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापले

Employee Strike : जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक काही दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. या संपामध्ये कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या अनेक मागण्या मान्यही करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले आहेत.

जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू करावी यासाठी राज्यातले सरकारी कर्मचारी काही दिवसांपूर्वी संपावर गेले होते. तेव्हा काम नाही, तर पगार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली होती. सरकारने काही मागण्या मान्य केल्याही होत्या. मात्र आता संपकरी कर्मचाऱ्यांचे पगार कापले आहेत.

या पेन्शनच्या मुद्द्यावरुन सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या. तसंच संपकाळात कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार नाही, असं आश्वासनही दिलं होतं. पण आता काढण्यात आलेल्या शासन निर्णयात मात्र तसा उल्लेख नाही.

संप काळातील कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात येईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply