Crime News दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; 10 लाख 83 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Crime News : कोपरगाव तालुक्यातील देर्डे- को-हाळे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले. त्यातील एक जण मोक्काच्या गुन्ह्यात फरार होता. पाेलिसांनी संशयितांकडून दहा लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय 21, रा. इंदिरानगर, ता. कोपरगांव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय 20, रा. एकरुखे, ता. राहाता), समाधान देविदास राठोड (वय 23, रा. करंजीबोलकी, ता. कोपरगांव), संदीप पुंजा बनकर (वय 33, रा. द्वारकानगर रोड, शिर्डी, ता. राहाता), उमेश तानाजी वायदंडे (वय 27, रा. गणेशनगर, ता. राहाता) अशी अटक केलेल्यांचे नाव असल्याचे सांगितले. याव्यतरिक्त अन्य दाेघांचा पाेलिस शाेध घेताहेत.

Ambernath Crime : दुहेरी हत्येने अंबरनाथ हादरलं, रात्रीच्या सुमारास दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या

या गुन्हेगारांकडून तलवार, कटवणी, गुप्ती, लाकडी दांडके, मिरची पुड्या असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल, दोन कार असा दहा लाख 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply